Advertisement
नागपूर : नागपूरच्या शाहिद गोवारी उड्डाणपुलावर कारने अचानक ब्रेक दाबल्याने विचित्र अपघाताची घटना घडली.
उड्डाणपुलावरून जाणारी वाहन एकमेकांना धडकल्याने काही काळासाठी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. एकंदरीत 6 गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याने या वाहनांचे मोठं नुकसान झाले.
आज 3 डिसेंबरला सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान लोकमत चौककडून झिरो माईलकडे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन जात असताना अचानक समोरील एका कारने ब्रेक मारला.
त्यानंतर हा ब्रेक अचानक लागल्याने मागून वेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला.