वाडी (अंबाझरी):राष्ट्रीय महामार्गावरील दत्तवाडी येथे आज गुरुवार दि,5 ला दुपारी दीड च्या सुमारास झालेल्या अपघातात एका इंजिनिअरिंक च्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला,मृतकाचे नाव वैभव पवनकुमार मिश्रा वय 19 राहणार रायपूर असे असून तो रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आय टी च्या द्वितीय वर्षाचा विध्यार्थी होता,वाडी पोलीस स्टेशन समोरील शिवशक्ती नगर येथे किरायाने राहत होता.
आज गुरुवारी दुचाकी वाहन एम एच 40 ए झेड 574 ने महाविद्यालयातून डिफेन्स मार्गाने दत्तवाडी कडे परत येत होता,डिफेन्स प्रवेशद्वारा समोरून अमरावती मार्ग ओलांडून येत असतांना एका रुग्णवाहिकेने नागपूर कडून दत्तवाडी कडे यु टर्न घेतला त्याच दरम्यान अमरावती कडून नागपूर कडे जाणाऱ्या ट्रक ची धडक लागून मृतक युवक ट्रकच्या मागील चाका खाली सापडला, त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटना स्थळी मृत्यू झाला,रुग्णवाहिका व ट्रक क्रं सी जि 04 जे सी 7075 पुढे निघून गेल्यावर दुचाकी व मृतक रक्तासह मार्गावर पडलेल्या अवस्थेत दिसल्याने आसपासचे दुकानदार व इतर वाहन धारकांनी गर्दी केली,घटनेची माहिती वाडी पोलिसात दिली.
पोलीस निरीक्षक नरेश पवार व वाहतूक उपनिरीक्षक बबन पवार घटना स्थळी पोहोचून स्थिती नियंत्रणात आणली,पंचनामा करून मृतदेह तातडीने नागपूरला पाठविण्यात आला,वाहतूक पोलिसांनी धावपळ करून ट्रक व चालक ताब्यात घेतले,सदर घटना हि असुरक्षित असून अपघातग्रस्त ठिकाण समजले जाते, दिवसभर येथे वर्दळ असते,वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्यावर तैनात दिसून येत नाहीत,बुधवार व रविवार या बाजाराचे दिवशी या ठिकाणी अधिक वर्दळ असते,वाहतूक पोलिसांचे दत्तवाडी परिसरात पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप समस्त नागरिकांनी केला आहे,