महायुती सरकारच्या खातेवाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे गृह खाते स्वतःकडे ठेवले आहे, तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
प्रमुख खाती आणि मंत्री:
– देवेंद्र फडणवीस: गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय
– एकनाथ शिंदे: नगरविकास, गृहनिर्माण
– अजित पवार: अर्थ, राज्य उत्पादन
भाजपकडे असलेली खाती:
– देवेंद्र फडणवीस: गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय
– चंद्रशेखर बावनकुळे: महसूल
– राधाकृष्ण विखे पाटील: जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
– चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
– गिरीश महाजन: जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
– गणेश नाईक: वन
– मंगलप्रभात लोढा: कौशल्य विकास
– जयकुमार रावल: मार्केटिंग, प्रोटोकॉल
– पंकजा मुंडे: पर्यावरण, हवामान बदल, पशुपालन
– अतुल सावे: ओबीसी, डेअरी विकास, अक्षय ऊर्जा
मुख्य खाती अनुभवी नेत्यांकडे देण्यात आली असून, विकास योजनांवर भर देण्याचा सरकारचा उद्देश आहे.