Published On : Fri, May 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खुनाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष सुटका

Advertisement

नागपूर : नागपूर इतवारी पोलीस स्टेशन येथील दाखल खुनाच्या खटल्यातील आरोपी सुनिल बाळकृष्ण राउत (रा. कळमना, नागपूर) याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. नागपूर न्यायालयाचे प्रधान मुख्य न्यायाधिश श्रीनिवास अग्रवाल यांनी ठोस पुराव्यांच्या अभावी आरोपीची निर्दोष सुटका केली.

माहितीनुसार, नागपूर छिंदवाडा पॅसेन्जर ट्रेनच्या बोगीमध्ये १३ मे २०२२ रोजी एक अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे डी वाय एस एस यांना मिळाली. रेल्वे पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टॉफ यांनी घटनास्थळावर जाऊन जखमी व्यक्तीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी सुनिल बाळकृष्ण राउत( रा. कळमना नागपूर ) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

उपचारादरम्यान जखमी व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आरोपीविरूध्द कलम ३०२ भादवी गुन्हायामध्ये वाढ करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.त्यानंतर सदर खटल्यात आरोपीची ३ मे २०२३ रोजी नागपूर न्यायालयाचे प्रधान मुख्य न्यायाधिश श्रीनिवास अग्रवाल यांनी ठोस पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. सदर खटल्यामध्ये आरोपीतर्फे अ‌ॅड. मदन पुराणिक यांनी बाजू मांडली.

Advertisement