नागपुर– नागपूर ग्रामीण जिल्हयात मागील काही महिन्यांपासुन होत असलेल्या वयोवृध्द लोकाची एटीएम कार्ड ची हातचलाखीने आदलाबदली करून एटीएम मशीन मधून पैशे काढून फसणूक केल्याबाबत नागपूर ग्रामिण अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला कलम ४२० भादवि अन्वये गुन्हे दाखल असून सदर गून्हयाच अनूषंगान आरोपीचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे करिता मा.पोलीसा अधिक्षक सा.नाग्रा यांनी दिलेल्या आदेशानूसार मा.पो.नि.अनिल जिट्टावार, स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०१-०९-२०२० रोजी स्था.गु.शा नागपूर ग्रामीण चे पथकपेट्रोलींग करीत असता गूप्त माहीतगारा व्दारे खात्रीशीर खबर मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी नामे मयूर अनिल कायरकर यास आकाशवाणी चैक नागपूर येथुन ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता आरोपीने उमरेड,कन्हान, सावनेर, कळमेंश्वर, कुही, खापखेडा, पारशिवनी इत्यादी ठिकाणी जावुन एटीएम मध्ये लोकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने आदलाबदली करून एटीएम मधून पैसे काढले याकामात आरोपीचा मित्र अनूप पजारे रा.अजनी, नागपूर हा त्याला मदत करीत होता.
आरोपीने पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत 05 गुन्हे, कन्हान अंतर्गत 05 गुन्हे, सावनेर अंतर्गत 02 गुन्हे, पारशिवनी – 01, कुही – 01, खापरखेडा – 01 गुन्हा, कळमेश्वर – 01 गुन्हा इत्यादी एकुण 16 गुन्हयामध्ये मोठयाप्रमाणावर लाखोच्यासंख्येत रक्कम काढल्याची कबुली दिली आरोपी हा त्याच्या मित्रा सोबत एटीएम मशिन जवळ जावुन वयोवृध्द इसमांना हेरून मदत करण्याच्या बहान्याने त्यांचेकडुन एटीएम कार्ड घेत असत व एटीम कार्ड परत करतांना आपल्याकडील त्या सारखा दिसनारा दुसरा एटीएम कार्ड संबंधीतास परत करत असत.
व हातचालाखीने घेतलेल्या एटीएम कार्डने दुसया एटीएम मशिनमधुन पैसे काढत असत. त्यामुळे काही वृध्दांनी आपल्या वृध्दापकाळाचा आधार म्हणुन बैंकेच्या खात्यात जी रक्कम ठेवलेली होती. त्या रक्कमेवरच हा आरोपी डल्ला मारत होता. आरोपीचा मित्र अनुप पजारे रा. नागपूर याचा शोध सुरू असुन लवकरच त्यालाही अटक केली जाईल सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, सहा. फौजदार बाबा केचे, पोलीस हवालदार संतोष पंढरे, मदन आसतकर, पोलीस शिपाई रोहन डाखोरे, बालाजी साखरे, राधेश्याम कांबळे, चालक पोलीस हवालदार भाऊराव खंडाते तसेच सायबर शाखेतील पोलीस शिपाई सतिश राठोड व महिला पोलीस नायक स्नेहलता ढवळे यांनी पार पाडली.
जनतेस आव्हान
लोकांनी एटीएम मधन पैसे काढतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक असुन पैसेकाढतेवेळी आपल्या मागे कोणी आपल्या एटीएम कार्डचे पासवर्ड बघत तर नाही नं याची खात्री करून घ्यावी. तसेचआपला पिन नंबर इतरांना सांगुन नये. अनोळखी इसमांची मदत घेवुन पैसे काढु नये. असे नागपूर ग्रामीण पोलीसांकडुनआपणास आव्हान करण्यात येत आहे. याप्रकारे कुणाची फसवणुक झाली असल्यास नागपूर ग्रामीण पोलीसांशी संपर्क करावा.
दिनेश दमाहे (9370868686)