कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लालाओली तुमडीपुरा रहिवासी 60 वर्षीय इसम मनोहरलाल शर्मा च्या फुल ओली चौक स्थित पांनठेल्यावर पांनठेलाचालक हा मित्रासोबत मस्करी करीत असता त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका वृद्ध इसमाला झालेल्या ती मस्करी त्यांना संबोधून झाली
या गैरसंमजुतीतून झालेला क्षुल्लक वाद विकोपला गेल्याने पांनठेला बंद करून घरी गेलेल्या पांनठेला चालकाच्या घरावर तुमडीपुरा येथे गैरसमजूत झालेल्या वृद्ध इसमासोबत 5 ते 6 आरोपींनि गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला चढवीत घरात घुसून पानठेल्या चालक सह त्याची पत्नी व सुनेला धक्काबुक्की करून त्याच्यासमोर अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना 1 नोव्हेंबर ला दुपारी दीड दरम्यान घडली यासंदर्भात फिर्यादी पानठेला चालक मनोहर लाल व्रज मोहन शर्मा यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपीविरुद्ध भादवी कलम 323, 504, 506 अनवये गुन्हा नोंदविला होता .
मात्र दाखल गुन्ह्यात-पीडित फिर्यादी ला समाधान न झाल्याने दिवसाढवळ्या घडलेली या प्रकारची अमानवीय घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे तेव्हा जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना समाजसेवक अज्जू अग्रवाल यांच्या नेतृत्वात दिलेल्या सामूहिक निवेदनातून पडताळणी केलेल्या घटनास्थळाच्या सीसीटीव्हि च्या चित्रीकरणा वरून गुन्ह्यात वाढ करून जवळपास 6 आरोपी विरुद्ध उपरोक्त नमूद कलमासह भादवी कलम 452 च्या गुन्ह्याची वाढ करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मात्र या प्रकरणात पोलीस विभागाने घेतलेल्या समयसूचकता व केलेल्या तर्कशक्तीच्या उपयोगामुळे दोन समुदायात राजकीय तसेच धार्मिक रंग लावणाऱ्यांच्या प्रयत्नाला चाप बसला परिणामी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यात पोलिसाना खरे यश लाभले.
संदीप कांबळे कामठी