नागपूर : बेसा-पिपळा रोडवरील अथर्वनगरी-३ मधील एका सदनिकेत एका ११ वर्षाच्या मुलीचा अमानुष छळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.आरोपी अझहर आणि तहा अरमान हे दोघेही लैंगिक शोषण करीत होते. इतकेच नाही तर मुलीच्या शरीरवाढीसाठी आरोपींनी तिला ‘हार्मोन्स’चे इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. त्यामुळे तिच्या शरीराच्या काही अवयवांची कृत्रिम वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे.
हिना शेख (२६) ही बंगळुरूतील श्रीमंत कुटुंबातील तरुणी असून तिचे नागपुरातील रिअल इस्टेट ब्रोकर तहा अरमान इशताक अहमद खान (वय ३९) याच्याशी लग्न झाले होते. ती पतीसह बेसा-पिपळा रोडवरील अथर्वनगरी-३ मधील सदनिकेत राहत होती. तिने आपला भाऊ अझहर शेख यालाही बोलावून घेतले. तिघेही मिळून बालिकेवर अत्याचार करीत होते. आरोपीपैकी अझहर शेख याने मुलीचे शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अझहर हा वकिलाच्या संपर्कात होता. त्याला प्रभारी ठाणेदार विक्रांत सगणे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हिनाचा भाऊ अझहर हा विवाहित असून तो विकृत असल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याची माहिती आहे.