नागपूर: पाचपावली पोलिसांनी वाहन चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून, यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण 1,15,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ८ एप्रिल २०२५ रोजी पार पडली.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील आदर्श नगर गल्ली क्र. १ येथे ७ ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञात आरोपीने घरफोडी करत सोनं-चांदीचे दागिने चोरले होते. याशिवाय, वाहन चोरीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी निशांत सुरेश पाली (वय १९ वर्षे, रा. व्ही.आर. कॉलनी, गोंड मोहल्ला, हनुमान नगर, कॉटन मार्केट, नागपूर) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध एकूण तीन गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलिसांनी आरोपीकडून स्प्लेंडर दुचाकी (MH-49 CE-9616) 60,000, सोन्याचे दागिने (फरफट नगरातील घरफोडी) 30,000 अंगठी (यशोदय नगरातील घरफोडी) – 25,000 असा एकूण 1,15,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.