Published On : Mon, Jul 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

हत्येच्या आरोपीला हावडा एक्सप्रेसमधून अटक

Advertisement

– नागपूर स्थानकावर सीसीटीव्ही फुटेज तपासले,आरपीएफ जवानांनी केली रेल्वेची झाडाझडती

नागपूर -केवळ सोन्याच्या अंगठीसाठी एका युवकाची हत्या करून रेल्वेने पळून जाणार्‍या आरोपीला आरपीएफच्या पथकाने तंत्रज्ञानाच्या मदतीने पकडले. समाजमाध्यामावर मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे नागपूर आणि अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांची झाडाझडती घेतली. खात्री पटल्यानंतर मध्यरात्री हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून आरोपीला अटक करून उमेरड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांची सक्रीयता, आरपीएफचे सहकार्य आणि तंत्रज्ञानाची मदत मिळाल्याने अवघ्या काही तासाच्या आत हत्येचा छडा लावला. रोशन काळगावकर (28), बादल लेंढे (26), दोन्ही रा. उमरेड, इतवारी बाजार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Gold Rate
15April 2025
Gold 24 KT 93,500/-
Gold 22 KT 87,000/-
Silver / Kg - 95,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमरेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव तेळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने आरोपीला पकडण्यात यश मिळाले. शुभम दमडू (25), रा.उमरेड, इतवारी बाजार असे मृतक युवकाचे नाव आहे. तो एका मोबाईल शॉपीत काम करायचा. त्याला आई आणि दोन बहिणी आहेत. रोशनच्या घरी त्याची हत्या करून आरोपी फरार झाले.

दरम्यान हत्येची माहिती उमरेड पोलिसांना मिळाली. पोलिस उपविभागीय अधिकारी भिमराव तेळे यांचा जनसंपर्क शहर आणि ग्रामीण पोलिसासह आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस अधिकार्‍यांशी असल्याने त्यांनी आरपीएफ (भुसावळ) व्हीजेलेन्स अधिकारी कल्याण मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर आरोपीचे छायाचित्र पाठविले आणि घटने संबधी माहिती दिली. मोरे यांच्याकडून ही माहिती अकोला आरपीएफ निरीक्षक आणि आरक्षक अमित कुमार यांच्यासह संपूर्ण आरपीएफ दलाला पाठविली.

दरम्यान उमरेडचे पोलिस पथक नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीणा यांची भेट घेतली. मीणा यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक विनोद खरमाटे, ब्रजेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी रोशन हा फलाट क्रमांक आठ वरून अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. रोशनकडे नागपूर ते सूरत अशी रेल्वे तिकीट होती. ही माहिती अकोला आरपीएफला देण्यात आली.

माहिती मिळताच अकोला आरपीएफ सक्रीय झाले. मध्यरात्री 1.15 वाजताच्या सुमारास गाडी अकोला रेल्वे स्थानकावर असताना आरपीएफ निरीक्षक यांच्या निर्देशाप्रमाणे आरपीएफ पथकातील ए.के. सिंह, अजय शुक्ला, प्रदीप सोनवाने, डी.ए. थोरात, आर.एल. गुर्जल, सी.एस. यादव, जी.आर. साबळे यांच्या पथकाने आरोपी रोशनला एस-9 बोगीतून ताब्यात घेतले. खात्री पटल्यानंतर आरोपी मिळाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव तेळे यांना देण्यात आली. तसेच लोहमार्ग पोलिस तिलकचंद रामटेके यांनी आरोपीला उमरेड पोलिसांच्या ताब्यात दिले. विजलेन्स निरीक्षक कल्याण मोरे यांच्याशी संपर्क असल्याने आरोपीला पकडण्यात यश मिळाले. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर आरपीएफची मदत झाली.

रोशनच्या घरी हत्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी रोशन हा उसाचा सर विक्री केंद्र चालवतो तर बादल हा पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण देतो. विशेष म्हणजे आरोपी आणि मृतक तिघेही एकाच परिसरात राहतात. आरोपींवर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांची नजर शुभमच्या अंगठीवर होती. शुभम दररोज दुपारी 3 वाजता घरी जेवनासाठी जात असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार आरोपींनी शुक्रवार 23 जुलै रोजी हत्येची योजना आखली. शुभम घरी जेवन करण्यासाठी निघाला असता रोशनने त्याला आपल्या घरी बोलाविले. रोशनच्या घरी कोणीच नव्हता. योजनेप्रमाणे आरोपीनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून शुभमची हत्या केली. त्याच्या बोटातील अंगळी काढली आणि मृतदेह घरातच ठेवून दोघेही फरार झाले.

Advertisement
Advertisement