नागपूर : पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दोन महिलांच्या मदतीने संबंधित महिला पोलिस आयुक्तालयात पोहोचली. तिने एका पोलिस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. तशी तक्रारही आयुक्तांकडे दिली.
आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, संबंधित पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील सहायक आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. हे वृत्त सर्वत्र पोहोचल्याने एकच खळबळ उडाली. यासंबंधाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले आहे.