Advertisement
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाच धमकीचे ईमेल आले होते. आरोपीने ईमेलच्या माध्यमातून अंबानी यांना ४०० कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यानंतर पोलीस विभागाकडून आरोपीचा शोध घेणे सुरु केला होता.
अखेर मुंबई पोलिसांनी आरोपीला तेलंगणा येथून अटक केली. गणेश रमेश वानपाधरी असे या तरूणाचे नाव असून पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले.
आरोपी गणेशला न्यायालयाने ८ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आठवड्याभरात अंबानी यांच्या कार्यालयीन मेलवर पाच ईमेल आले. आधी २० कोटी नंतर २०० कोटी आणि मेलला प्रतिसाद देत नाही म्हणून ४०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.