Advertisement
नागपूर : आपल्या लहान हिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
माहितीनुसार, सिद्धार्थ चंदन बागडे (वाडी) असे आरोपीचे नाव असून तो विकृत मनोवृत्तीचा आहे. आतापर्यंत अनेक मुलींची त्यांनी छेडखानी केली. ज्याही मुलींसोबत त्याने हे कृत्य केले आहे. त्या मुलींनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी त्याला बदडले आहे. आता अशाच प्रकारचे कृत्य त्यांनी पुन्हा केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ बागडेला अटक केली.