नागपूर : बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेवती नगर येथील अमरनाथ पानठेल्या जवळ झालेल्या एका वादात फिर्यादी सागर संगीतलाल शाहु याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, फिर्यादी सागर संगीतलाल शाहु (३२, रा. प्लॉट न. १५, रेवती नगर, बेसा रोड ) हा जेवण झाल्यावर मित्रासह पानठेल्यावर गेला होता. त्याठिकाणी आरोपी नितीन गुप्ता (वय ३० वर्ष रा. खानखोजे नगर), अखिलेश श्यामसुंदर मिश्रा (वय ३० वर्ष रा. न्यु नरसाळा रोड), आदित्य किशोर पाचभाई (वय १९ वर्ष रा काचोरे ले आउट, बुट्टीबोरी ), राहुल सर्यवंशी ( वय ३० वर्ष रा. अयोध्या नगर, साई मंदीर जवळ ) यांनी शाहु यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अखिलेश मिश्रा आणि सागर शाहु यांच्यात वाद सुरु आहे.
याच वादातून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. यातील एका आरोपीने फिर्यादीस बिअर बॉटल फेकून मारली व फिर्यादीचे खिश्यातील ७०० रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यातील एका आरोपीने फिर्यादिला चाकू मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे मित्र श्रीकांत बोडखे यांनी त्यास पकडले. फिर्यादीने तेथून पळून जी गेला असता आरोपींनी त्याचा दुचाकीने पाठलाग त्याला अश्लिल शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यांनतर फिर्यादीने पोलीसांना तातडीने फोन केला.
याप्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३९२, ४५२, २९४, ५०६ (ब) ३४ भादवा अन्यये गुन्हा नोंदवून त्याना अटक केली आहे. पोलीस शिपाई सचिन बसोडे यांनी दिलेल्या तकारीवरून आरोपी नितीन गुप्ता यांचे विरुद्ध कलम ३०९, २९४, ५०६(ब) भादवा सहकलम ३ मा मालमत्ता नुकसान प्रति कायदा अन्यये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.