नागपूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाडीत फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या ११ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली.
ज्वलनशील वस्तू घेऊन रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गंत कारवाई करण्यात येते. संबंधितांवर एक हजार रुपयांचे दंड किंवा तीन वर्षांचा तरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असून फटाके प्रतिबंधित वस्तू आहे. हे पाहता दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने दिवाळी तोंडावर विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे. यावेळी वेगवेगेळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या ११ जणांना फटाके बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने आखले नियम :
भारतीय रेल्वे हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. म्हणूनच रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी मानली जाते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने अनेक नियम केले आहेत. यामुळे त्यांना आनंददायी आणि सुरक्षित प्रवास करण्यास मदत होते. असे असले तरी ट्रेनमध्ये काही वस्तू घेऊन जाणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या गोष्टींसह प्रवास केल्यास आपल्याला दंडही होऊ शकतो आणि तुरुंगवासही होऊ शकतो.