नागपूर : नागपूर शहरातील महावितरणच्या सिव्हिल लाईन्स विभाग अंतर्गत येणाऱ्या इंदोरा, लष्करीबाग,जरीपटका,नारा,कामठी रोड इत्यादी भागात महावितरणच्या वतीने वीज चोरी विरुद्ध मोहिम राबविण्यात आली. यावेळी वीज चोरी करताना आढळलेल्या ६१ जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत नागपूर शहर मंडलातील अभियंते,अधिकारी,कर्मचाऱ्यांसह नागपूर शहर,गोंदिया व चंद्रपूर येथील भरारी पथकाने सक्रियपणे सहभाग घेतला.
वीज चोरी व वीज बिल न भरणाऱ्यांच्या विरोधात महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येतात. सिव्हिल लाईन्स विभाग अंतर्गत येणाऱ्या इंदोरा,लष्करीबाग,जरीपटका,नारा,कामठी रोड,गोंडपुरा,बारसे नगर,पाचपावली,लुम्बिनी नगर,हमीद नगर,योगी अरविंद नगर,दीक्षित नगर,कामगार नगर व दीपक नगर इत्यादी भागात आज सोमवारी पोलीस बंदोबस्तात वीज चोरी विरुद्ध मोहीम राबविण्यात आली.यावेळी ६१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्या नेतृत्वात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत टेम्भेकर, मदन नानोटकर,प्रसन्ना श्रीवास्तव,उपकार्यकारी अभियंता निलेश भगत, भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास नवघरे, उमप, संजय मते,अमोल करंडे उपकार्यकारी अभियंता दिलीप फुंडे,सहाय्यक अभियंता अमोल बन्सोड,मंगेश ताकसांडे,राहुल चिंतलवार,तुषार मेंढे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.