नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत अमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी ड्रग्ज, रिव्हॉल्व्हरसह १२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एमडीची खेप घेण्यासाठी काही अमली पदार्थ तस्कर नंदनवन परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून व्यंकटेश नगर येथून राजू गिरी उर्फ डुपेंद्र चमन गिरी गोसावी व साहिल सोळंकी यांना कारसह ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यात 59 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी एक पिस्तूल आणि मोबाईलसह सुमारे 12 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.चौकशीत आरोपींनी खून, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी भाविक निवृत्ती महाजन याच्याकडून ही औषधे आणल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी भाविक महाजनलाही शोधून अटक केली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कारवाई पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल,निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. गजानन गुल्हाने, पोहवा विजय यादव, मनोज नेवारे, शैलेश दोबोले, नितीन साळुंके, पवन गजभिये, विवेक अढाउ, अरविंद गेडेकर, पोलीस अंमलदार सहदेव चिखले, रोहीत काळे, सुभाष गजभिये मपोहवा अनुप यादव यांनी केली.