Advertisement
नागपूर: नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २ मार्च) रोजी ११ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,२७,००० चा दंड वसूल केला. पथकानी १०२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.