Published On : Sat, Apr 7th, 2018

सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई : पालकमंत्री

Advertisement


नागपूर: विद्यार्थ्यांच्या सुऱक्षेसाठी असलेले नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई करून चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले.

बेसारोडवर पोद्दार इंटरनॅशनल या सीबीएसई शाळेच्या व्हॅनला आज अपघात या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. या शाळेला पालकमंत्री बावनकुळे यांनी आज भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नियमानुसार या शाळेला सर्व्हिस रोड नसल्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात आले आहे. या शाळेसह जिल्ह्यातील सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश आज देण्यात आले. शाळेसारख्या संस्था मुख्य रस्त्यांवर असतील तर त्यांना सर्व्हिस रोड तयार करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

सर्व्हिस रोड बांधल्याशिवाय शाळेची इमारत बांधता येत नाही. तरीही पोद्दार इंटरनॅशनल या शाळेने नियम धाब्यावर बसवून शाळेचे बांधकाम केले. एनएमआरडीच्या अधिकारक्षेत्रात ही शाळा असल्यामुळे सर्व प्रक़ारची पाहणी करून चौकशी करण्याचे निर्देश देऊन शाळेला नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मिळालेल्या माहितीनुसार 90 टक्के शाळांनी सर्व्हिस रोड बांधलेले नाहीत. तसेच बेसा घोगली वेळा हा रस्ताही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज हा अपघात झाला तेव्हा टिप्परच्या चालकाचा तोल सुटला व टिप्परने पोद्दार शाळेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला धडक दिली. या व़्हॅनमधून विद्यार्थी खाली उतरत असतानाच टिप्परने घडक दिली. चार विद्यार्थी जखमी झाले, तर एकाला जास्त इजा झाली. या बांधकामाला वेळाहरी ग्रामपंचायतीने परवानगी दिली असल्याचे सजमते.

Advertisement