Published On : Thu, Feb 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१० फेब्रुवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४४७९९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. २,०७,५८,५००/- चा दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ११, धरमपेठ झोन अंतर्गत २, नेहरुनगर झोन अंतर्गत ८, गांधीबाग झोन अंतर्गत ११, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३, लकडगंज झोन अंतर्गत २७, आशीनगर झोन अंतर्गत २ आणि मंगलवारी झोन अंतर्गत ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३९३२९ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ९६ लक्ष ६४ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement