Published On : Mon, Jun 28th, 2021

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभांवर कारवाई

Advertisement

– चार ठिकाणाहून ५० हजारांचा दंड वसूल

नागपूर : कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने आजपासून प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल केला.

Gold Rate
Friday 21 March 2025
Gold 24 KT 88,800 /-
Gold 22 KT 82,600 /-
Silver / Kg 100,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दोन कारवाया धंतोली झोनमध्ये तर हनुमान नगर आणि नेहरू नगर झोन मध्ये प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई धंतोली झोनंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात 100 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते.

अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते. सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी 10 हजार रुपये असा 20 हजारांचा दंड ठोठावला. याच झोननंतर्गत दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली.

त्यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई हनुमान नगर झोनंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर नेहरू नगर झोन अंतर्गत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहात उपद्रव शोध पथकाने एकनाथ चामट यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तसेच उपद्रव शोध पथकाने ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement