नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ, धंतोली, गांधीबाग आणि नेहरू नगर झोन अंतर्गत बाजारपेठांमध्ये राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईत गुरुवारी ८० अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.आणि रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
नऊ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत कार्यालयापासून सीताबर्डी मेन रोड, यशवंत स्टेडियम, धंतोली महाजन मार्केट, महाराजबाग परिसर आणि व्हरायटी स्क्वेअरपर्यंत रात्री ९ वाजेपर्यंत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. नेहरू नगर झोनमधील भांडे प्लॉट स्क्वेअर ते दिघोरी स्क्वेअर दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या भागांच्या दोन्ही बाजूंच्या रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे उभारलेले स्टॉल आणि दुकाने हटवण्यात आली.
अशा प्रकारे याठीकानाहून तीस अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या कारवाईदरम्यान तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. धंतोली आणि गांधीबाग झोन अंतर्गत गणेशपेठ बस स्टँड ते बैद्यनाथ चौक, मेडिकल चौक ते शिवाजी पुतळा चौक, अग्याराम देवी चौक ते कॉटन मार्केट चौक, रेल्वे स्टेशन परिसर, संत्रा मार्केट चौक ते अग्रसेन चौक या भागात कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान ५० अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सहाय्यक आयुक्त हरीश राऊत, अंमलबजावणी अधीक्षक संजय कांबळे आणि कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.