Published On : Wed, Jan 24th, 2018

कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Advertisement


नागपूर: मनपाचे बहुतांश उत्पन्न हे मालमत्ता करावर अवलंबून असते. त्यामुळे करवसुली हे कर्मचाऱ्यांचे सर्वप्रथम उद्दिष्ट असायला हवे. या कार्यात जो कर्मचारी कुचराई करेल, त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिला.

मार्च २०१८ पूर्वी करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठता यावे यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे हे करवसुलीचा झोननिहाय आढावा घेत आहेत. मंगळवारी (ता. २३) सतरंजीपुरा, गांधीबाग, नेहरूनगर झोनचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मनपाचे बाजार अधीक्षक डी.एन.उमरेडकर, कर अधीक्षक गौतम पाटील, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी झोनच्या सर्व कर निरिक्षकाकडून त्यांची डिमांड व कर वसुली किती झाली, थकीत करबाकी किती आहे, याबाबत माहिती घेतली. संथगतीने काम करणाऱ्या करनिरीक्षकांना त्यांनी उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सभापती संजय चावरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते. झोनचे क्षेत्रफळ मोठे असेल तर जवळच्या ठिकाणी कर वसूली केंद्र उघडण्यात यावे, व त्याची जाहीरात करण्यात यावी, असे निर्देश जाधव यांनी दिले. गांधीबाग झोनमध्ये घेतलेल्या बैठकीत सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, सहायक आयुक्त अशोक पाटील तर नेहरूनगर झोनच्या आढावा बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे, सहायक आयुक्त राजेश कराडे उपस्थित होते.

Gold Rate
09 April 2025
Gold 24 KT 89,200/-
Gold 22 KT 83,000/-
Silver / Kg - 90,400/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement