मुंबई : ‘महाभारत’मध्ये ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटलची यांची निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु, उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुफी पेंटल यांच्या पार्थिवावर आज (५ जून) सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
गुफी पेंटल यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफू चक्कर’ चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ या भूमिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले.
गुफी यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली.