Published On : Sat, Nov 4th, 2017

देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस: नाना पाटेकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे, मला हा माणूस खूप आवडतो. ते मुख्यमंत्री असल्यासारखं कधी वावरत नाहीत. चुका असतील तर मान्य ही करतात. त्यांची ही वृत्ती फार छान आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. मुंबईतील व्हीजेटीआय इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मी भाजपचा प्रवक्ता नाही किंवा इतर कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस अत्यंत परखड व काटेकोरपणे बोलत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांची मुलाखत पाहिली. अत्यंत स्पष्टपणे त्यांनी आपल्या हातातून झालेल्या चुका मान्य केल्या. त्या चुका कशा कमी करता येतील, याबद्दलही भाष्य केले. त्यांची ही वृत्ती फार छान आहे. हा माणूस मुख्यमंत्र्यांसारखा वागत नाही. विशेष म्हणजे भाजपच्या काळात एकही भ्रष्टाचार समोर आला नसल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्याचा एकही नेता शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यासारखा नाही. उगाच मोठमोठ्या आवाजात ते ओरडतात. यामुळे लोकांच्या कानाला त्रास होतो, हे त्यांना कधी कळणार, असा उपहासात्मक सवालही विचारला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नानांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.

नानांनी यावेळी फेरीवाल्यांचे समर्थन केले. फेरीवाले आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हणत फेरीवाले चुकीचे नसल्याचे ते म्हणाले. यासाठी महापालिका, प्रशासन यांचीच चूक आहे. त्यांनी फेरीवाल्यांना जागा का दिली, याला आपणच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटातील काही किस्से सांगताना त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. तसेच कोकणी माणसांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.

Advertisement