Published On : Fri, Apr 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील फौजदारी न्यायालयाकडून अदार पूनावाला यांना १० हजार कोटी नुकसान भरपाईची नोटीस

Advertisement

नागपूर : देशात कोरोनाने थैमान घातले असताना इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशिल्ड लस आणली. हि लस आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी घेतली आहे. मात्र या युवकांमध्ये या लसीमुळे मोठे दुष्परिणाम होत असल्याचा आरोप अवलोकन इंडिया मुव्हमेंटचे वरिष्ठ सदस्य आणि दैनिक देशोन्नतीचे वरिष्ठ संपादक प्रकाश गोपाळराव पोहरे यांनी केला. पोहरे यांनी नागपुरातील फौजदारी न्यायालयात सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पोहरे यांच्या वतीने न्यायालयामार्फत अदार पूनावाला यांना दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाईचा नोटीस पाठविण्यात आला होता. परंतु पाठविलेल्या नोटीसचा सिरम इंन्स्टिट्युटच्या संचालकाकडून कोणतेही प्रतिउत्तर मिळाले नाही.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे त्यांनी नगपुरातील न्यायालयामध्ये केस दाखल केली होती. दहा हजार कोटीच्या नुकसान भरभाईची केस न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी त्यांना तीन लाख रुपये खर्च आला. तो खर्चसुध्दा प्रकाश पोहरे यांनी न्यायालयात जमा केला होता. त्यानंतर १५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीमध्ये अदार पूनावाला यांच्या नावाने नागपूर उच्च न्यायालयामार्फत नोटीस पाठविण्यात आली.

कोविशिल्ड लसीपासून खासकरुन युवकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामध्ये युवकांमध्ये हृदय विकार या आजाराचे प्रमान खुपच वाढले आहे. या सोबतच लकवा, गुडघ्याचे दुखणे, जॉइंट पेन, आंधरेपणा, बहिरेपणा, मधुमेह, किडणी फेल होणे, कर्करोग, त्वचा रोग, आणि मेंदूशी संबंधित समस्या सामोर आलेल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराशी लढण्याची शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याच्या समस्यासुध्दा कोविशिल्ड लशीशी जुडलेल्या आहेत. जगभरातील असे संशोधन आणि तक्रारी पुढे आलेल्या आहेत. ज्यामध्ये कोरोना या आजारापेक्षा लसीकरणामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे बोलले गेले आहे.आदर पूनावाला आणि त्यांचा भागीदार बिल गेटस् यांनी देशातील केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याशी हातमिळवणी करुन संपूर्ण देशात कोविशिल्ड लसीकरण चालवले. येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत कोविशिल्ड व्युर्णपणे सुरक्षित आहेत, असे खोटे बोलून जबरदस्तीने नागरिकांना लसीकरण करुन देशातील कोटीच्या घरातील जीव धोक्यात टाकले असल्याचा आरोप पोहरे यांनी केला.

पोहरे यांच्याकडून माजी न्यायमूर्ती ओंकार काकडे आणि इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश ओझा हे केस लढत आहेत. न्यायालयाने सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला आणि विवेक प्रधान यांना नोटीस पाठविण्यात आले आहे. २० एप्रिल २०२३पर्यंत अदार पूनावाला यांनी स्वतः या आपल्या वकिलामार्फत नोटीसचे उत्तर देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने हे सुध्दा म्हटले आहे की, २० एप्रिलपर्यंत अदार पूनावाला यांनी स्वतः या वकिलामार्फत न्यायालयामध्ये हजर होऊन उत्तर दिले नाही तर त्यांच्या गैर हजेरीमध्ये न्यायालय या प्रकरणाचा निकाल लावून निर्देश देईल.
न्यायालयाने अदार पूनावाला यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे.

कोविशिल्डमुळे डॉक्टर स्नेहल लुनावत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणातसुध्दा एक हजार कोटीची नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अदार पूनावाला आणि बिल गेटस्ला नोटीस पाठविण्यात आली आहे.विशिल्डच्या गंभीर दुष्पपरिणामा विरुद्ध अवलोकन इंडिया मोहीम आणि इंडियन बार असोसिएशन आणि देशभक्त मानवाधिकार संस्थांनी आवाज उचलला होता. सत्यासाठी लढा देणाऱ्या संस्थेवार खोटे गुन्हे दाखल करुन संस्थेच्या सदस्यांना अटक करण्याची मागणीसुध्दा करण्यात आली होती. परंतु पुणे पोलिसांनी सीरम इंन्स्टिट्युटची खोट्या तक्रारीवर कारवाई केली नाही. अवलोकन इंडिया इंडियाच्या तीन हजार सदस्यांनी सीरम इंन्स्टिट्यूटवर जवळपास ४ लाख कोटी रुपयांची नुकसान भरपाईचे नोटीस पाठविले होते. परंतु यालाही काहीच उत्तर मिळाले नाही. पोहरे यांनी लसीकरणासंदर्भात विचालेल्या प्रश्नांची उत्तरे अदार पूनावाला यांना द्यावी लागणार आहेत. पोहरे हे संपादक असून ते देशातील जनतेच्या जीवासाठी लढाई लढत आहेत. या मोहिमेसाठी देशातील जनतेच्या समर्थनाची त्यांना गरज आहे.

Advertisement