Advertisement
नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (Adv. satish Uke) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने काल (३१ मार्च, गुरुवारी) पहाटे ५ वाजता छापा (Raid) मारला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांची २ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अॅड. सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईला रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अॅड. सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना रात्रभर नागपूर विमानतळाच्या आत बसवून ठेवले होते.
रात्रभर अधिकाऱ्यांनी उके बंधूंची विमानतळावरच चौकशी केली. ईडीचे अधिकारी उके बंधूंना काल रात्री 11.20 च्या विमानाने मुंबईत नेण्यासाठी नागपूर विमानतळावर आले होते, मात्र त्यांना रात्री न नेता सकाळी मुंबईला नेण्यात आले.