नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित ”स्वेच्छा रक्तदान शिबिरात” आपले सामाजिक कर्तव्य करीत नागपूर महानरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी “रक्तदान” केले.
मंगळवार (ता२८) रोजी मंगळवारी झोन कार्यालयात ”स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचंल गोयल यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, एच.डी.एफ.सी. बँकेचे डिप्टी वाइस प्रेसिडेंट श्री. पंकज भईया, वरिष्ठ प्रबंधक श्री. वैभव चौधरी, प्रबंधक श्री. माहुल शिर्के, अर्पण ब्लड बँकचे व्यवस्थापक श्री. सत्यम सिंग, मंगळवारी झोनचे प्रभारी सहायक अधीक्षक श्री. अजय परसतवार, प्रभारी झोनल अधिकारी श्री. भूषण गजभिये, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान यांच्यासह कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी स्वतः रक्तदान करीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचंल गोयल यांनी ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असल्याचा संदेश देत आपल्या रक्तदानाने कुणाचा तरी जीव वाचू शकतो त्यामुळे नागरिकांनी देखील रक्तदान करावे असे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणेने कम्प्युटर ऑपरेटर अश्विनी अशोक मेंढे यांनी देखील स्वतःहून रक्तदान केले. तसेच शिबिरात एकूण 26 नागरिकांनी रक्तदान करुन आपला सामाजिक कर्तव्य पार पाडले.
सर्वप्रथम डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी श्रीमती आंचल गोयल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी मंगळवारी झोनचे कर्मचारी श्री. यशवंत बक्सरीया, श्री. सुधिर पवार, श्री. वसंत गोंडाणे, श्री. विशाल रमेश दुबे, श्रीमती मिनाक्षी रविंद्र भगत, श्री. आदिल रशिद. श्री. शेखर निखारे, श्री. पंकज लाड, श्री. योगेश बोरकर इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.