कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे-तहसिलदार अरविंद हिंगे
कामठी :- सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या नागरी सुरक्षा हितार्थ विविध उपाययोजना करण्यात येत असून लॉकडोऊन च्या या पाचव्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा देण्यात येत आहे यासोबतच थांबलेल्या अर्थचक्राला गती येणार आहे तरीसुद्धा नागरिकांनी मास्क वापरल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही याची नागरिकांनी दक्षता घेत सोशल डिस्ट नशिंग चे पालन कायम ठेवावे .कामठी तालुक्यात आजपावेतो 10 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते त्यातील 6 रुग्णांनी कोरोनावर मात काढण्यात यश मिळविले असून सध्यस्थीतीत कोरोना बाधितांची संख्या ही फक्त चार आहे
तेव्हा ह्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने अजून एक खबरदारी उपाय म्हणून शहरातील प्रत्येक 50 कुटुंबामागे एकाला पालकत्व देण्यात येत असून यामध्ये स्थानिक नगर परिषद प्रशासनिक अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी सह स्थानिक नगरसेवकांचा तसेच शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्याचा सुद्धा सहभाग लाभावा यासाठी एसडीओ श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात टप्याटप्याने सदर समस्त विभागातील कोरोना योद्धांची कार्यशाळा घेण्यात आली.याप्रसंगी रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा असे आव्हान एसडीओ श्याम मदनूरकर यांनी केले तर कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले यानुसार जवळपास 250 च्या वर संख्येतील चमू ही उद्या 9 जून पासून शहरात सर्वेक्षण करणार आहेत.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील डॉ कृष्णा, मुख्याधिकारी रमाकांत डाके,नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत , उपाध्यक्ष मो शाहिदा कलिंम अन्सारी, नगरसेविका संध्या रायबोले, रमा नागसेन गजभिये, सावला सिंगाडे, सुषमा सिलाम, ममता कांबळे, वैशाली मानवटकर,नगरसेवक काशीनाथ प्रधान, संजय कनोजिया, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, रघुवीर मेश्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसिलदार हिंगे यांनी संगीतले की उद्यापासून सूरु होणाऱ्या सर्वेक्षण मध्ये मधुमेह, हृदयरोग असे आजार असलेले वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी,ताप, खोकला, यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे तातडीने सकारात्मक उपचार करीत त्यांची काळजी घ्यावी व नजरकैदेत ठेवावे,तर खबरदारीचा उपाययोजना म्हणून शहरामध्ये प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात यावे त्या कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विविध आजाराबाबत माहिती जमा करण्यात यावी त्याचप्रमाने कुटुंबातील अँड्रॉइड मोबाईल वापर करणाऱ्या सदस्यांनी आरोग्य सेतू ऐप डाऊनलोड केला आहे किंवा नाही याबाबतची माहिती देण्यात यावी तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावे असे आव्हान सुद्धा करण्यात आले.
-या सर्वेक्षण साठी नगर परोषद शिक्षक, खासगी शाळांचे शिक्षक , शिक्षिका , आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांची प्रभागनिहाय नियुक्ती करण्यात आली असून या सर्वांची आज कार्यशाळा घेऊन सर्वेक्षण चे मार्गदर्शन करण्यात आले .
बॉक्स:-कोरोनाला हद्दपार करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसिलदार अरविंद हिंगे व डॉ कृष्णा, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मुख्य उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत बैठक घेण्यात आली होती
संदीप कांबळे कामठी