नागपूर: नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी हे तळमळीचे कार्यकर्ते असून त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. विद्यापीठात विविध पदावर कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न सरकार दरबारी जोरकसपणे मांडण्यासाठी त्यांना या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन पशुसंवर्धन, दूध विकास व्यवसाय मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
काँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस , शिवसेना , पिरिपा ( कवाड़े गट) , आरपींआय( गवई गट)आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांनी शनिवारी वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व कारंजा येथे प्रचार सभा घेतली.
या तिन्ही सभांना ना. सुनील केदार यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबतत वर्धा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर, शिवसेनेचे बाळाभाऊ शहागटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमर काळे यांचीही उपस्थिती होती. आर्वी येथील सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोपाळ मरसकोल्हे, शिवसेनेचे बाळाभाऊ जगताप उपस्थित होते.
अॅड. वंजारी यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या निवडणूक कॉंग्रेस भाजपावर मात करीत बहुमताने निवडून अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.