Published On : Sat, Jan 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

‘खासदार औद्योगिक मोहोत्सव’ हा केवळ संधींचा अभाव लपविण्याचा देखावा आहे का ?

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला खसदार औद्योगिक महोत्सव हा उद्योगांसाठी वरदान ठरला आहे. मात्र, महाविदर्भ जनजागरणचे निमंत्रक नितीन रोंघे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. ‘खासदार औद्योगिक महोत्सव’ केवळ ‘संधीचा अभाव लपविण्यासाठी करण्यात येत असलेली फसवणूक आहे का ?असा प्रश्न दोघांनीही उपस्थित केला.

नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत, महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांनी सांगितले की, “2007 मध्ये गडकरींनी मिहानमध्ये एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगार दिल्याचा दावा केला होता. या तथाकथित प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी प्रोजेक्टरचाही वापर केला होता. यशवंत स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजनही केले होते.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, मिहानमध्ये एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला असेल, तर मिहान फ्लायओव्हरवर वाहतूक कोंडी का होत नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘खसदार औद्योगिक मोहोत्सव ‘ हा सर्वसामान्य बेरोजगार तरुणांची दिशाभुल करणारा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

डिसेंबर २०२३ च्या नागपूर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ११,००० हून अधिक तरुणांना रोजगार देण्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावाही फोल ठरल्याचे रोंघे म्हणाले.

फडणवीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेचदा सक्रिय असतात आणि या साइट्सवर त्यांचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तथापि, या रोजगार मेळाव्याद्वारे नियुक्त केलेल्या एकाही व्यक्तीने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे काहीही पोस्ट केलेले नाही. ज्याचे मला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.

ॲडव्हांटेज महाराष्ट्र, मेक इन इंडिया आणि दावोसच्या माध्यमातून विदर्भात किती गुंतवणूक झाली याबाबतही रोंघे यांनी फडणवीस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. 2014 पासून विदर्भातील सरकारी नोकऱ्यांमधील किती अनुशेष दूर झाला हे उघड करण्याची मागणीही त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

याच विषयावर बोलताना एमपीसीसीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी खासदार औद्योगिक महोत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि गडकरींना ५०,००० वार्षिक नोकऱ्या देण्याच्या त्यांच्या वचनाची आठवण करून दिली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, गडकरींनी दरवर्षी ५०,००० नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी त्या वेळी खासदार औद्योगिक महोत्सव सुरू केला असता, तर या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत झाली असती. मात्र, याला फार उशीर झाल्याने ते या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत , असे मुत्तेमवार म्हणाले.

मुत्तेमवार यांनी गडकरींना असेही सुचवले की, “खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्याबरोबरच, गडकरींनी महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्याअभावी बंद पडलेल्या विविध एमएसएमईचा आढावा घ्यावा आणि उद्योग शेजारच्या राज्यात स्थलांतरित होण्यामागील कारणांचे मूल्यांकन करावे.

शुभम नागदेवे

Advertisement