नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू झाली असून विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यामार्फत प्रचार साहित्याची छपाई मोठ्या प्रमाणात करुन घेण्यात येते. प्रचार साहित्यांवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव तसेच किती प्रती छापल्या याची माहिती असणे आवश्यक आहे.
या प्रचार साहित्य छपाई केलेल्या छपाई करण्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेलया माध्यम नियंत्रण व प्रमाणीकरण समितीमार्फत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच छपाईसंदर्भातील मजकूर या समितीमार्फत तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रचार साह्त्यिाची छपाई करावी व त्याबाबत छपाई करण्यात आलेल्या प्रती याबाबतची माहिती मुद्रणालयाच्या व्यवस्थापकाने जिल्हा नोडल अधिकारी आचार संहिता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर तसेच माध्यम नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथील कक्षात सादर करावी, अशा सूचना आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी रविंद्र खजांजी यांनी दिली.