Published On : Fri, Nov 30th, 2018

नागपुरातील कामाची प्रगती व वेग पाहून प्रभावित : राफ ईकॉर्न

Advertisement

तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेली विकास कामे येथे येणा-यांना आपल्याकडे आकर्षित करणारी आहेत. ही कामे झपाट्याने होत असल्याने आपसूकच भुवया उंचावल्या जातात. नागपुरात सुरू असलेली विविध प्रकारची विकास कामे ही प्रभावित करणारी आहेत, असे प्रतिपादन कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड रॉफ ईकॉर्न (Mr. Ralf Eichhorn) यांनी केले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू शहरांमध्ये झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळासाठी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा शुक्रवारी (ता. ३०) समारोप झाला.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी एनएसएससीडीसीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, कार्लस्रू शिष्टमंडळातील कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न (Mr. Ralf Eichhorn), कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन बुल्ह (Mr. Steffen Buhl), कार्लस्रू अर्बन प्लानिंग डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ. इंग अँक कारमन-वोएस्नर (Ms Prof. Dr.-Ing. Anke Karmann-Woessner), युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायंसेस इंस्टिट्यूट ऑफ ट्राफिक ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रा. डॉ. इंग जान रील (Prof. Dr.-Ing Jan Riel), स्ट्रेटॅजी आर्किटेक्ट ऑलिवर विल (Mr. Oliver Will), कार्लस्रूच्या पुणे इनोव्हेशन कार्यालय प्रमुख श्रीमती इरिस बेकर (Ms. Iris Becker), एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, अरुण सेल्वसरू, मेट्रोचे कार्यकारी संचालक (नियोजन) एस.के. सिंगला, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशनचे आशीष पंडित, आशीष वर्मा आदी उपस्थित होते.

नागपूर शहरामध्ये यापुर्वी जानेवारी महिन्यात भेट दिली असता शहरातील विकास कामे पाहता आली. त्यानंतर आता पुन्हा शहरात भेट देण्याची संधी मिळाल्याने शहरातील विकास कामांच्या प्रगतीने पहिल्याच दिवशी प्रभावित केले. स्मार्ट सिटी, मेट्रो व इतर विकास कामांमुळे नागपूर शहर भविष्यात एक रोल मॉडेल ठरणार, असा आशावादही यावेळी कार्लस्रूच्या शिष्टमंडळातील पदाधिका-यांनी व्‍यक्त केला.

स्मार्ट सिटीची संकल्पना स्पष्ट करताना एनएसएससीडीसीएल चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणजे दरररोज चारचाकी वाहनातून नोकरी अथवा कार्यस्थळी जाणे व परत येणे नव्‍हे. आपल्या आरोग्याची काळजी घेत व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विचार करून पायी अथवा सायकलचा वापर करून आपल्या कार्यस्थळी पोहोचणा-या व्‍यक्तींच्या शहराला ख-या अर्थाने स्मार्ट सिटी म्हणता येईल.

तीन दिवसीय कार्यशाळेत नागपूर आणि कार्लस्रू या दोन्ही शहरांकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती एनएसएससीडीसीएल चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी यावेळी दिली. नागपूर शहराला प्रदूषण मुक्त करण्याच्या उद्देशाने व कार्लस्रूमधील पर्यावरणपूरक सार्वजनिक सायकल वाहतूक व्यवस्था राबविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नागपूर शहरामध्ये सायकल वाहतुकीची संकल्पना रुजविण्यासाठी त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. जर्मनीमधील दोन विद्यार्थीनी शहरात वास्तव्यास असून या सायकल वाहतूक जनजागृती अभियासाठी या विद्यार्थीनी पुढाकार घेणार आहेत, असेही एनएसएससीडीसीएल चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले.

तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी कार्लस्रूच्या शिष्टमंडळातील सर्व मान्यवरांचा एनएसएससीडीसीएल चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यशाळेमध्ये

Advertisement
Advertisement