राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh) अखेर जेलमधून बाहेर आले आहेत. राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते स्वत: अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेलबाहरे हजर होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(State President Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार(Leader of Opposition Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले.
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देशमुख जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले असले तरी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कडक अटी घातल्या आहेत. या अटींचे अनिल देशमुख यांना पालन करावे लागणार आहे(Bombay High Court imposed strict conditions).
अनिल देखमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज उभी होती. कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. देशमुख यांच्यावर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले.