नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता प्राप्त करून दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी (ता.१७) नागपुरात आगमन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवर्षाव करून वंदन केले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात निळा दुपट्टा घालून त्यांचे हृद्य स्वागत केले.
यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा माजी मंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सतीश सिरसवान, प्रभाकर मेश्राम, संदीप गवई, वत्सला मेश्राम, लखन येरवार, मंगेश गजभिये, राम अहिरवार, अंतकला मनोहरे, सोनू निंबाडे, विशाल मेश्राम, बंडू गायकवाड, सुमित्रा सलोटकर, राजेंद्र वानखेडे, रोहित बढेल, रोशन बरमासे, नूतन शेंदूरणीकर, नागेश मानकर, संदीप बेलेकर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.