नागपूर: नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता.या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतकांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.
या घटनेनंतर आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील आकडे तपासता गेल्या 24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. यात 16 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर 9 रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातले आहेत. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान राज्यातील ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला. तर तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात होणारे मृत्यू औषधांचा तुटवडा किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे.