नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची उपस्थिती होती. मात्र सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला.कार्यकर्त्यांची संख्या शेकडोच्या घरात होती, त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांना बॅरिकेडिंग लावून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत आत जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान कार्यकर्त्यांना थांबिण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यादरम्यान मोठा गोंधळ उडाला यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले जखमी कार्यकर्त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. इतकेच नाही तर सभेचे आयोजन करणाऱ्या रोहित पवार आणि सलील देशमुख यांच्यासह सुमारे २०० ते ३०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Published On :
Tue, Dec 12th, 2023
By Nagpur Today
शरद पवारांच्या सभेनंतर नागपुरात पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, अनेक जण जखमी
Advertisement