नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रमोहिमेच्यायशानंतर सूर्याभ्यास मोहीम हाती घेतली आहे. यापार्श्वभूमीवर आज ‘आदित्य एल१’चं यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.११ वाजून ५० मिनिटांनी PSLV-C57 ने अवकाशात झेप घेतली आहे. Aditya L1 हे मुख्य यानापासून वेगळं होण्यासाठी पुढील ६३ मिनिटे वाट पहावी लागणार आहे.
आत्तापर्यंत तरी यानाचा प्रवास हा सुरळीत सुरु आहे. पृथ्वीपासून ६४८ किलोमीटर उंचीवर हे यान शेवटच्या टप्प्यापासून वेगळं होणार आहे.
दरम्यान आदित्य एल१’चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांनी कौतुक केले आहे. दित्य एल१’चे यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, असे गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीगडमध्ये बोलताना म्हटले.
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदित्य एल१’चे यशस्वी प्रक्षेपणनंतर भाष्य केले. इस्रोच्या या आत्मविश्वासाला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने लाख शुभेच्छा. चांद्रयानाप्रमाणेच भारताची ही सौरयान मोहीम यशस्वी ठरेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचा झेंडा दिमाखाने फडकत राहील, असा विश्वास आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना हार्दिक शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.