Published On : Mon, Jul 9th, 2018

तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळांनी चढल्या विधानसभेच्या पायऱ्या

Advertisement

नागपूर: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेली २ वर्ष तुरुंगात काढलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात आगमन झाले. भुजबळ अधिवेशनाचा कामकाजात गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच पूर्णपणे सहभाग नोंदवत असल्यामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरांची नजर त्यांचावर खिळली होती. छगन भुजबळांचे अधिवेशनात आगमन होत असल्याने राष्ट्रवादी चे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानभवनाचा प्रवेशद्वारा जवळ त्यांचे स्वागत करून सन्मानाने त्यांना सभागृहाकडे नेले. यावेळी सभागृहाचा पायरयांवर सांसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनीही भुजबळांचे हात मिळवीत स्वागत केले.

अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कामकाजात भाग घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी” कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

Gold Rate
07 April 2025
Gold 24 KT 88,800/-
Gold 22 KT 82,600/-
Silver / Kg - 89,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement