नागपूर :राज्यात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या..”असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले.