Published On : Sat, Jun 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात जेष्ठ नागरिकांचा आक्रमक पवित्रा;सरकार आणि प्रशासना विरोधात आंदोलन

Advertisement

नागपूर: राज्य सरकार आणि स्थानिक प्रशानाकडून होणाऱ्या अत्याचार व छळाच्या विरोधात नागपुरातील जेष्ठ नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

यापार्श्वभूमीवर आज नागपूरच्या संविधान चौकात जेष्ठ नागरिकांनी निदर्शने करून लक्ष वेधले.ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, वृद्धापकाळ चांगला जावा, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, याकरिताकेंद्र व राज्य सरकारकडून सुचना प्रसारित केल्या.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२०१३ मध्ये भगतसिंग कोशियारी समितीने मान्य केलेली ईपीएस ९५ पेंशन वाढ व महागाई भत्ता दिलेला नाही. ज्येष्ठांची रेल्वे प्रवास सवलत बंद केली, नासुप्र, मनपा व ३३ पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला नाही, या गोष्टींकडे जेष्ठांनी लक्ष वेधले.

ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांना भेटीकरीता २ ते ३ तास ताटकळत ठेवणे, प्राधान्य असलेल्या सोयी सुविधा न देणे, प्रश्न रेंगाळत ठेवणे, ठराविक वेळेत निर्णय न घेणे या तक्रारी घेऊन नागरिकांनी आज हातात फलक घेऊन आंदोलन केले.

Advertisement
Advertisement