नागपूर: कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी महाराज यांची हत्या करण्यात आली.या निर्घुण हत्येबाबाबत जैन समाजात संतापाची लाट पसरली असून त्याचे पडसाद आज नागपूरात पाहायला मिळाले. आज शहरातील गांधी पुतळा चौक ते संविधान चौकापर्यंत जैन समजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.
जैन साधू कमकुमार नंदजी महाराज यांच्या हत्येने देशात सर्वत्र ठरले खळबळ माजली आहे. सर्वत्र याचा निषेध करण्यात येत आहे.
नागपुरातील आजच्या निषेध मोर्च्यात भाजप नेते गिरीश व्यासही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. व्यास म्हणाले की, सदर झालेली घटना ही घृणास्पद तर आहेच, पण ती अत्यंत नियोजन पद्धतीने झाली असल्याने या कटात सामील सर्वच्या सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे.
इतकेच नाही तर सदर कटातील आरोपी हे कर्नाटक सह इतर राज्यातील असल्याच्या बाबत विविध माध्यमातून समजत असल्याने हा तपास कर्नाटक पोलीसांकडून काढून घेवून सीबीआयकडे देण्यात यावा,अशी मागणी व्यास यांनी केली. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही यात लक्ष घालावे अशी मागणी व्यास यांनी केली.