नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
लोंढे यांचे आरोप भाजपने फेटाळले आहे. लोंढे यांनी तथ्यहीन आरोप करत मुख्यमंत्र्यांची मानहानी केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन दिले. पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयातील व्यक्ती नाही याची जाण लोंढे यांना होती. मात्र तरीदेखील त्यांनी जाणुनबुजून आरोप केले व त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुकडे यांनी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके, महामंत्री गुड्डू त्रिवेदी,अर्चना डेहनकर, राम अंबुलकर,श्रीकांत आगलावे, प्रामुख्याने उपस्थित होते.