चंद्रपूर: जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव इथल्या शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद पडली. ज्या झोपडीतून दारूविक्री व्हायची, ती झोपडीही महिलांनी पेटवली.
शेवटी पोलिसांनी दाखल होत दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले . घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान केलेल्या कारवाईत पोलिसांनी तीन हजार रुपयांची दारू जप्त केली.
दरम्यान दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
दारूबंदीपूर्वी म्हणजे २०१० ते २०१४ या काळात १६,१३२ गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४०,३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी १७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली, असे शासनाने म्हटले आहे.