सोनेगाव:-आयुध निर्माणी अंबाझरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलभूत मागण्यांसाठी लोकशाही कामगार (यु.) संघटनेतर्फे दि.१/८/२२ ,ते ५/८ २२ या कालावधीत कामबंद आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ७.१५ ते ७.४० या वेळेत झालेल्या या आंदोलनात गेट क्र.३ ला घोषणाबाजी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.१५ वा.यंत्र इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक आणि सीएमडी यांना देण्यात येईल.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कर्मचार्यांची प्रलंबित बिले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी, उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ५४ तास ओटी सुरू करा, सर्व विभागांमध्ये साधने आणि कच्चा माल वेळेवर उपलब्ध करून द्या, हॉस्पिटलमध्ये भेट देणार्या डॉक्टरांची नियुक्ती करा, कल्याणकारी सुविधा पुन्हा सुरू करा.
हे आंदोलन आयबीडीईएफचे कार्याध्यक्ष श्री. अरुण नागदेव यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय अध्यक्ष श्री सतीश बागडे, केंद्रीय सरचिटणीस श्री विनोद नंदागवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मार्गदर्शक वेदप्रकाश सिंग, सुदर्शन मेश्राम, अविनाश रंगारी, जगदीश गजभिये, दीपक नागराडे व सल्लगार धनराज मेश्राम, किरण हाडके, हरीश काळे, सतीश मनोहरे यांनी सहकार्य केले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रकाश बोरकर, माजी आ. सरचिटणीस रवी मेश्राम , दीपक खिराडे, प्रीतम सोनवणे, सचिन पोहरकर, शैलेश रामटेके, अनुपम चौरे, राजेश हिरेखान, शीतल अंबादे, रजनीश देवकाते, सुशील मंडले, अमित वानखेडे, सचिन भटकर, मिलन गणवीर, राकेश सुरवण्ण कुमार, मिलन कुमार , रजनीश देवकाते, नंददीप मून आदी युनियनचे सदस्य उपस्थित होते.