वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी हल्लाबोल मोर्चा काढला. विदर्भवाद्यांनी जोरदार हल्लाबोल मोर्चा काढून राज्य सरकारचे लक्ष वेधले. नागपूर विधानभवनावर हा मोर्चा काढण्यात आला.
राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू झाली आहे. या हिवाळी अधिवेशनात बहुतांश पक्षांच्या आमदारांनी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे नागपुरात विदर्भ राज्य समितीच्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
नागपुरात (Nagpur) विदर्भवादी वेगळ्या विदर्भासाठी आक्रमक झाले आहेत. विदर्भवाद्यांनी नागपुरात विधानभवनावर वेगळ्या विदर्भ राज्यासाठी मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनार मोर्चा काढला.
विदर्भ राज्य समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच मोर्चा काढला. मोर्च्यात विदर्भवादी नेत्यांनी फारच आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, विदर्भवाद्यांचा हा मोर्चा पोलीस थांबविण्यासाठी पुढे आले. पोलिसांनी हा मोर्चा मोरीश कॉलेजजवळील टी पॉइंटवर रोखण्यात आला आहे.
वेगळ्या विदर्भाची पहिली मागणी केव्हा झाली?
विदर्भ वेगळा करण्याची मागणी ही नागपूर करारानंतर करण्यात आली. परंतु ही मूळ मागणी मध्य प्रदेशमध्ये आणि विदर्भ हा सीपी अँन्ड बेरार राज्य अशी ओळख असलेल्या प्रदेशापासून आहे. त्यावेळी आठ जिल्हा असलेला भाग एका जिल्ह्यात रुपांतरीत झाला. मात्र, ही मागणी १०० वर्षांपूर्वी झाली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी देश स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात झाली. तेव्हापासून ही वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे.