आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगराद्वारे आज नागपुर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणार्या इंधनावरील शुल्काला घेऊन आंदोलने करण्यात आले व निवासी उपजिल्हाअधिकारी विजया बनकर यांच्या मार्फेत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.
जागतिक स्थरावर कच्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत हे सर्वजण जाणतात पण असे असतांना सुद्धा देशातूल जनतेला महागाई पासुन दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पट्रोलवर ८ रूपये आणि डिझेलवर ६ रूपये जनतेकरीता कर कमी केलेला आहे. यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. पण केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रामक पाऊल उचलले. आजच्या घटकेले केंद्र सरकारचा कर हा १९ रुपये आकारते आहे व ३० रू कर हा राज्य सरकार आकारते आहे. महाराष्ट्र राज्य संपुर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे. संपुर्ण देशातील इतर राज्य १७-१८ रूपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीने ऐव्हड्या मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला कर हा जनतेवर होणारा घोर अन्याय आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे निवेदनात म्हणण्यात आले की राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल व जर का हे पाऊल येणार्या ३ दिवसांमध्ये म्हणजेच ७२ तासांमध्ये उचलले नाही तर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आक्रामक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
आजचे संपुर्ण आंदोलने हे भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. तसेच प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त डेहणकर, रितेश राहाटे, सचिन सावरकर, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सह-प्रमुख मनमित पिल्लारे, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे प्रामुख्यने उपस्थित होते.
आजचे आंदोलन दक्षिण-पश्चिम नागपुरात निलेश राऊत यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक विजय चुटुले, शहर मंत्री हर्षल तिजारे, अक्षय दाणी, आशुतोश भगत, अंकीत वानखेडे उपस्थित होते. दक्षिण नागपुरात अमर धरमारे यांच्या नेतृत्वात महामंत्री आकाश भेदे, अमित बाराई, हिमाशु शुक्ला, सुरज दुबे उपस्थित होते. पुर्व नागपुरात सन्नी राऊत यांच्या नेतृत्वात आशिष मेहर, पिंटू पटेल, घनश्याम ढाले, गोविंदा काटेकर, अन्नु यादव, हर्षल मलमकर, विकास रहांगडाले, हर्षल वाडेकर, शैलेश नेताम, शुभम पठाडे, विवेक ठवकर, कार्तिक रोकडे, तुषार ठाकरे, तुषार राऊत, जयेश बिहारे, करण अग्रवाल, अतुल कावळे, प्रतिक टेटे, अनंत शास्त्रकार, विशाल बेहनिया, मंगेश लेंडे, पल्लवी गिरोले, स्वाती वाघ उपस्थित होते. मध्य नागपुरात बादल राऊत यांच्या नेतृत्वात अक्षय ठवकर,हरीश निमजे, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, शुभम समुद्रे, समीर येवले, यश पांडे, सागर , पांडे,मोनू मने, नयन भगत, प्रशांत दुर्गे, अनुप खोब्रागडे, पवन महाकालकर,सोनू वर्मा, हितेश डवले, विक्की मंडलिक, सोमेश गौर, राहुल वाटकर, रुपेश कावळे, भावेश माताघरे, शुभम मौदेकर उपस्थित होते. पश्चिम नागपुरात शेखर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात ईशान जैन, अक्षय शर्मा, गौरव पाठक उपस्थित होते. उत्तर नागपुरात पंकज सोनकर यांच्या नेतृत्वात अमित पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय साजवाणी, सौरभ पराशर, विक्की बगले, अषिश मिश्रा प्रविन बिलसे उपस्थित होते.