नागपूर : दीक्षाभूमी रोडवर आज सकाळी एका कारने पेट घेतल्याने सर्वांची धावपळ उडाली. सुदैवाने वेळीच चालक गाडीतून उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. . मात्र, या घटनेमुळे परिसरात वाहतूक व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
माहिती मिळताच बजाज नगर पोलिसांचे पथक आणि नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कारला लागलेली आग लगेचच विझली. या आगीने कार पूर्णपणे जाळून खाक झाली असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
मात्र, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.