खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
कामठी :- शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्याची कृषी विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान नागपूर जिल्हा परिषद चे कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य यानो आज कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जिल्हा परिषद चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे, जी प सदस्य नाना कंभाले, कामठी पंचायत समिती चे बीडीओ सचिन सूर्यवंशी,पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य तसेच तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, पंचायत समिती कृषी अधिकारी शुभांगी कांमडी, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ लीना पाटील,संजय गायकवाड, विस्तार अधिकारी प्रीती गाडे, यासह ग्रा प सरपंच व उपसरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या सात जून पासुन खरीप हंगामाची सुरुवात होत आहे तेव्हा या खरीप हंगामाची बाब लक्षात घेता कामठी तालुक्यातील खरीप हंगामाचे नियोजन व त्याबाबतच्या उपाययोजना संबंधात ही खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीत खरीप हंगाम पेरणीसाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खत याची उपलब्धता , शेतकऱ्याची मागणी व त्याबाबतचे नियोजन , पेरणी पेरणीपूर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या अडीअडचणी चा आढावा घेण्यात आला तसेच खरीप हंगाम बाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाच्या वतीने करण्यात यावे याबतची सुदधा चर्चा करण्यात आली तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कोणते खते वापरावे , कोणत्या बियाणांची उत्पादन क्षमता काय आहे
याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच जे अल्पभूधारक , आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी आहेत त्यांच्या बांधावर बी बियाणे खते पोहोचवून देण्याची कृषी विभागाने सोय करावी तर कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना त्याबाबत आवश्यक बी बियाणे खते ही त्यांच्या बांधावरच कशे उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी तर कोरोना मुळे शेतमजुरांची संख्या ही रोडावणार असल्याने धान व कापूस क्षेत्रात पारंपरिक पद्धतीनेच धानाची लागवड करावी असे आव्हान सुद्धा सभापती वैद्य यांनी केले. तर याप्रसंगी जी प चे विरोधी पक्ष नेता व जी प सदस्य अणिल यांनी तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी सुदधा खरीप हंगामात धान व सोयाबिन चा पेरा वाढणार आहे त्यामुळे सोयाबीन व धान पिकाचे बोयाने दर्जेदार व योग्य उगवण शक्ती देणारे उपलब्ध होतील याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे याकडे सभेचे लक्ष वेधले तर प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी तालुक्यात फुल शेती पिकाच्या नुकसानीच्या विषयाकडे लक्ष वेधले.
संदीप कांबळे कामठी