Advertisement
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
दरम्यान 1 एप्रिल 2024 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. याआधी 19 किलोच्या सिलिंडरच्या दरात सलग दोन महिने वाढ करण्यात आली होती.
1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.
मात्र 14 किलोच्याघरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागपूर, मुंबई घरगुती वापरण्यासाठीचा सिलिंडर 802.50 रुपयांना मिळत आहे.