Published On : Mon, Oct 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून घोषणांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १९ महत्वाचे निर्णय

Advertisement

मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. यातच आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज घेतलेले महत्वाचे निर्णय-

1.मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3.समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9.खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10.राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11.पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12.किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13.अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14.मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15.खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16.मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17.अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18.उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

Advertisement
Advertisement